Weather Update |संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. हवामान विभाग देखील दररोज पावसाबद्दलचा अंदाज देत असतात. अशातच आज म्हणजे 23 जुलै 2024 रोजी पावसाचे वातावरण कसे असणार आहे. हे देखील सांगितलेले आहे. हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर काही भागांना रेड अलर्ट दिलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update) पुढील काही तास हे आता मुंबई शहर आणि उपनगरासाठी महत्त्वाचे असणार आहे. कारण या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ताशी 45 ते 50 किलोमीटर वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे.
पुण्यामध्ये आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा देखील सुटणार आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला असून या विभागाला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे साताऱ्यात हे आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
त्यामुळे प्रशासनाने आज नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्यास सांगितलेली आहे. त्याशिवाय कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आव्हान देखील करण्यात आलेले आहे. शिवाय रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये देखील ऑरेंज अलर्ट जाणून केलेला आहे. या ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच पुढचे एक ते दोन दिवस पावसाचा जोर हा कायम राहण्याची देखील शक्यता आहे.