Weather Update | राज्यात पुढील 2-3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला अलर्ट

0
2
Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस घेत पडला. परंतु त्यानंतर पावसाने एक दोन आठवडे चांगलेच विश्रांती घेतली होती. आता पुन्हा एकदा राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अशातच हवामान विभागाने देखील पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त केलेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस राज्यात सर्वत्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच मुंबईतही जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. मुंबई सोबतच ठाणे पालघर रायगड, रत्नागिरीसाठी देखील ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने झाली जारी केलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस (Weather Update)पडणार आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील घाट परिसरात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे. तसेच कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. बाकी शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे

उत्तर महाराष्ट्रात विजांचा कडकडाटासोबत सोसाट्याचा वारा देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यासोबतच नांदेड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, परभणी या भागात देखील चांगला पाऊस (Weather Update) पडणार आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामुळे गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि अमरावती या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस चांगलाच पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान देखील हवामान विभागाकडून करण्यात आलेले आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पुढील दोन दिवसात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे नदी नाले आणि धरणे भरण्याची देखील शक्यता आहे. परंतु या पावसानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा उन्हाचा पारा चढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.