Weather Update | महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी; हवामान विभागाने दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर अनेक ठिकाणी आपल्याला अगदी हलक्या पावसाचे (Weather Update) दृश्य पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान विभागाकडून पावसाबाबत काही ना काही अंदाज समोर येत असतो. अशातच आता आजही मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. यामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. तसेच विदर्भात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

या विभागाला दिला ऑरेंज अलर्ट | Weather Update

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणामध्ये आज अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे कोकणामधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याची देखील आवाहन प्रशासनाच्या वतीने दिलेली आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

या भागात पावसाचा येल्लो अलर्ट

हवामान खात्याने विदर्भातील काही भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यासह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना देखील पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे.