Weather Update | दोन-चार दिवसांची सुट्टी घेतल्यानंतर आता पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे. पुण्यात देखील हवामान खात्याने आज पावसाचा (Weather Update) रेड अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे आता विनाकारण पुणेकरांनी बाहेर झालं टाळावे असे देखील सांगितलेले आहे. हवामान विभागाने आज म्हणजे 3 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यामध्ये घाट माथ्यावर अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे इतर भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे.
पुण्या व्यतिरिक्त सातारा जिल्ह्यातही आज अतिमुसळधार पावसाचा (Weather Update) इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. घाट माथ्यावर देखील अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. त्याचप्रमाणे कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये देखील स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. कारण या भागात देखील पावसाचा इशारा आज देण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर हे जिल्हे जर वगळले तर संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. उरलेल्या सगळ्या जिल्ह्यांना आज हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील जिल्ह्यात देखील आज अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. या ठिकाणी सोसाट्याचा वारा देखील वाहणार आहे. वाऱ्याचा वेग हा 36 ते 40 किलोमीटर प्रतितास एवढा असणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात देखील आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्याचप्रमाणे विदर्भातील जिल्ह्यात देखील आज पावसाचा अंदाज आणि सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट भागत देखील अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.




