Weather Update | राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाची स्थिती आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे. मागील महिन्यामध्ये पावसाने काहीशा प्रमाणात विश्रांती घेतलेली होती. परंतु मागील आठवड्यापासून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे. काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलेली आहे, तर काही ठिकाणी मात्र चांगलाच पाऊस पडला आहे. यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. त्यामुळे नदी, नाले, धरणे तुडुंब भरलेली आहे. धरणातील पाणीसाठा देखील बराच वाढलेला आहे. अनेक धरणेही 100% भरलेली आहे. हवामान विभाग पावसाबद्दल रोज नवनवीन माहिती देत असते. अशातच हवामान विभागाने (Weather Update) वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात राज्यात अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.
गेल्या दोन दिवसापासून राज्यातील काही भागांमध्ये पाऊस (Weather Update) पडत आहे, तर काही भागांमध्ये ऊन सावलीचा खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसात राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. शुक्रवारपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, सातारा, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागांनी या भागांना येलो अलर्ट दिलेला आहे.
त्याचप्रमाणे विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये देखील येथे आठवड्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. यासोबतच मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र या ठिकाणी हवामान दिलेला आहे.
सध्या देशातील हवामान सारखे बदलत आहे. तर गुजरात राज्यातील कच्छ आणि सौराष्ट्र भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले असून मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा कच्च्या पासून ते सौराष्ट्र उदयपूर शिवपुरी सिद्धी अंबिकापुर पूर्वी आग्नेय या भागात बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे. त्यामुळे आता येत्या आठवड्यात महाराष्ट्र अनेक ठिकाणी पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.