Weather Update | कुठे ऊन, तर कुठे कोसळणार मुसळधार सरी; जाणून घ्या पावसाचे आजचे अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात हवामानात वेगवेगळे बदल झालेले आपण पाहत आहोत. कधी ऊन कधी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी चांगले वातावरण होत आहे. अशातच आता हवामान विभाग नेहमीच पावसाबद्दल अंदाज व्यक्त करत असतात. हवामान विभागाने सोमवारी म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने केलेले अंदाजानुसार कोकणच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात देखील पाऊस पडणार आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच राज्यातील तापमानात देखील चढ-उतार होण्याची शक्यता आहे. आज राज्यातील अनेक ठिकाणी तापमान हे 31 अंशच्या पुढे असण्याची शक्यता आहे.

आज कोठे पाऊस पडणार |Weather Update

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात देखील पाऊस कोसळणार आहे. त्याचप्रमाणे विदर्भात पाहायला गेले, तर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर यांसारख्या जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. यामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार यांसारख्या जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. तसेच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड यांसारख्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.