Weather Update | राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाने दिली माहिती

Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | गेल्या काही दिवसापासून पावसाचे चक्र फिरलेले दिसत आहे. कधी ऊन पडत आहे, तर कधी पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. मध्येच खूप पाऊस पडत आहे, तर लोकांना खूप गरम होत आहे. अशातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपाचा पाऊस वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडणार आहे. या सोबतच पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसारख्या ठिकाणी देखील पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान विभाग दररोज पावसाविषयी (Weather Update) अंदाज व्यक्त करत असतात. पण अशातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यासोबत पुण्यात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यासोबत हा हवामान विभागाने विदर्भात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे आता विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

सध्या गणपतीची धूमधाम सर्वत्र चाललेली दिसत आहे. आणि पावसाचा (Weather Update) जोर मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशातच आता मराठवाड्यात पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात 9 सप्टेंबरपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काही ठिकाणी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा देखील दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांना पुढील दोन दिवस काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.