Weather Update | राज्यामध्ये सध्या विविध ठिकाणी जोरदार पाऊस बरसताना दिसत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये पाऊस चांगलाच बरसत आहे. अशातच हवामान विभागाने 13 जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला होता. त्याचप्रमाणे आज म्हणजे 14 जुलै रोजी काही जिल्ह्यांमध्ये (Weather Update) अतिवृष्टीचा इशाराही हवामान खात्याने दिलेला आहे.
गेले काही दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूकीला चांगलाच फटका बसला आहे. अशातच आता रविवारी हवामान विभागाने (Weather Update) ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ठाण्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील रेड अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे रायगडमध्ये देखील अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. काही ठिकाणी 100 mm अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पुढील 48 तासांमध्ये मुंबईत चांगलाच पाऊस पडणार आहे. असे देखील सांगितलेले आहे.
त्याचप्रमाणे घाट भागात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा आणि कोल्हापूरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. 11 जुलैपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. त्याचप्रमाणे पुढील दोन ते तीन दिवस पाऊस राहणार आहे.