Weather Update | यावर्षी पावसाने चांगली धुमधडाक्यात महाराष्ट्रात एन्ट्री केलेली आहे. परंतु सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसात खंड पडलेला आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसात पावसात जोरदार पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातील केवळ पश्चिम भागात म्हणजेच कोकण, सह्याद्री, पुणे जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी तुरळ स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आता पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रात हवामान कसे असणार आहे हे आपण पाहूया.
29 जून रोजी हवामान | Weather Update
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या विभागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
30 जून रोजी हवामान
30 जून रोजी अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये दक्षिण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहेत.तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पुणे या भागात देखील अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
1 जुलै रोजी हवामान
1 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
2 जुलै रोजी हवामान | Weather Update
2 जुलै रोजी देखील बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या ठिकाणी तुरळ पाऊस पडणार आहे. त्याप्रमाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.