Weather Update | गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाने अनेक लोकांचे नुकसान देखील झालेले आहे. राज्यातील काही भागात पुढील पंधरा तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज म्हणजेच 12 जून रोजी कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळ पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे.
हवामान विभागाने (Weather Update) वर्तवलेल्या अंदाजानुसार आज नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग देखील सारी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तसेच मुंबई, पुणे या ठिकाणी देखील पावसाच्या देण्यात आलेला आहे. मान्सून मुंबईमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता पाऊस मुसळधार पडणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिलेली आहे.
मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार | Weather Update
मराठवाड्यातील नांदेड धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 12 जून रोजी नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना यांसह मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे 13 जून रोजी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.