Weather Update | मुंबईकरांसाठी पुढील काही तास महत्वाचे; ‘या’ विभागांना दिला सतर्कतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पावसाने थैमान घातलेले आहे अशातच आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे पुढचे 36 तास मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे मुंबईत 200 mm पर्यंत पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. मुंबईत मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. तसेच अंधेरी सबवे खाली तीन ते चार मीटर पाणी भरल्यानंतर आता अंधेरी सबवे देखील बंद करण्यात आलेला आहे.

सकाळपासूनच पावसाने मुंबईमध्ये हजेरी (Weather Update) लावलेली आहे. त्यामुळे सलग भागात देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झालेला दिसत आहे. अनेक ठिकाणची वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज मुंबईसह ठाणे आणि पालघरला देखील पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मुसळधार ते अतीमुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणेसह पालघर येथे देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील महाराष्ट्राने साताऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे विदर्भात देखील आज पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे देखील सांगण्यात आलेले आहे.

त्यामुळे येत्या 72 तासात देशात अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 13 ते 15 जुलै दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, सिक्किम, ओडीसा, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो.