हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Weather Update मागील काही दिवसापासून राज्यांमध्ये उष्णतेचे प्रमाण जरी वाढले असले, तरी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले होते. अजूनही काही ठिकाणी अवकाळी पावसाचे हे संकट कायम आहे. अशातच आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. तर मुंबईतील अनेक ठिकाणी उष्णतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
पुण्यासह राज्यातील (Weather Update) 11 जिल्ह्यांमध्ये गुरुवारी 25 एप्रिल रोजी पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे. काल मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर उन्हाचा चटका वाढेल. असा देखील हवामान विभागाने इशारा दिला होता.
राज्यामध्ये आत्तापर्यंत मालेगाव येथे सर्वाधिक तापमानाची म्हणजेच 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केलेली आहे .येथे कमाल तापमानाचा पारा सरासाठी 1.3 असेल वाढला होता. त्यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी ढगाळ वातावरण होते. नांदेड, परभणी, जालना, अमरावती, वर्धा या जिल्ह्यात वादळी पावसाचा देखील तडाका होता.
त्याचप्रमाणे अहमदनगर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, सांगली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा तसेच विजा पाऊस आणि गारपिटीचा अंदाज लावलेला होता. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला होता. (Weather Update) त्याचप्रमाणे वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.