Weather Update: महाराष्ट्रात 24 तासांत वादळी वारे अन अवकाळी पाऊस; IMD कडून इशारा

Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – राज्यातील हवामानात चढ-उतार होऊन, ठराविक भागात जोरदार पाऊस अन गारपिटीची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासामध्ये , विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटी होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतपिके आणि फळबागांवर गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या पिकांचे नुकसान होण्यापासून वाचवता येईल.

24 तासांत काही भागांमध्ये पावसाचा इशारा (Weather Update) –

पुणे हवामान विभागाने पुढील 24 तासांत राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. त्यात विशेषतः पुणे, नाशिक, जळगाव आणि धुळे यांचा समावेश आहे. मराठवाड्यात चक्री वादळासारखी स्थिती निर्माण झाल्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. IMD च्या अंदाजानुसार हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचे वारे होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच राज्याच्या तापमानात वाढ झाल्यामुळे नाशिक, जळगाव आणि धुळे याठिकाणी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना अवकाळी पावसाच्या संकटासह तापमानवाढीचा सामना करावा लागणार आहे. याचप्रमाणे, राज्यातील इतर भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी राहण्याचा अंदाज आहे.

कोकण विभागातही पावसाची स्थिती –

कोकण विभागातही (Weather Update) पावसाची स्थिती तयार होत आहे. रत्नागिरीसह आसपासच्या भागात पाऊस पडेल अशी शक्यता आहे. उत्तर कोकण, ठाणे आणि कल्याण भागांमध्येही पावसाचा अंदाज आहे.