हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – यंदाच्या वर्षी राज्यातील थंडीचे पर्व अपेक्षेपेक्षा कमी काळासाठी सक्रिय राहिल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेचा तडाखा अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील काही भाग वगळता, मध्य महाराष्ट्र व कोकणात तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. यामुळे उकाड्याची स्थिती वेगाने वाढत असून, राज्यात पावसाळी ढगांचं सावट देखील निर्माण झालं आहे. तर चला हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नेमकं वातावरण कस असणार याची अधिक माहिती जाणून घेऊयात .
तापमानातील बदलाचे कारण (Weather Update) –
तापमानातील या असामान्य वाढीचे मुख्य कारण म्हणजे पॅसिफिक महासागरात सध्या सक्रिय असलेली ‘ला नीना’ प्रणाली. या प्रणालीमुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक वाढले आहे. आयएमडीच्या मते, एप्रिलपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे, आणि त्यानंतर तिचे परिणाम हळूहळू कमी होण्यास सुरूवात होईल. यामुळे फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यभर उकाड्याचा तडाखा –
राज्यातील कोकण किनारपट्टी क्षेत्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान (Weather Update) राहण्याची शक्यता असून, यंदाच्या वर्षी उकाडा तुलनेत लवकर सुरू होणार आहे. विशेषतः नवी मुंबई, पश्चिम उपनगरं आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत रात्री उशिरा तापमानात घट नोंदवली जाणार असली तरी, या गारठ्याचा प्रभाव फार काळ टिकण्याची शक्यता कमी आहे. राज्यभर उकाड्याचा तडाखा वाढत असताना, पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता देखील आहे.
हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज
BCCI चा मोठा निर्णय? यंदा सचिन तेंडुलकरला ‘हा’ खास पुरस्कार मिळणार?