हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – महाराष्ट्रात काही दिवसापासून तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तापमान 37 अंशांपर्यंत पोहचले आहे. तसेच 24 तासानंतर या तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी सकाळी थंडी अन दुपारी तापमानाचा वाढता जोर यामुळे नागरिक चिंतेत पडले आहेत. तर आज आपण ठराविक भागातील तापमानाच्या (Weather Update) अंदाजाविषयी जाणून घेणार आहोत.
तापमानात वाढ (Weather Update) –
35 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पोहोचल्याने राज्यातील हवामानात दाहकतेचा प्रभाव अधिक तीव्र होत आहे. लोणावळा, जे थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे, येथेही तापमान 37.6 अंशांपर्यंत पोहोचल्याने यावर्षीचा उन्हाळा त्रासदायक असू शकतो . तर नैऋत्य भागापासून चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव असून, उत्तर भारतात पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा सर्वाधिक प्रभाव आहे. महाराष्ट्राच्या वायव्य भागात तापमानात चढ-उतार सुरू आहेत. कोकण किनारपट्टीमध्ये दमट वातावरण वाढले आहे आणि उष्मा अधिक जाणवू लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात वाढ (Weather Update) होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईतील हवामानाचा दर्जा –
मुंबईतील हवेचा (Weather Update) दर्जा मागील दोन महिन्यांपासून सुधारत आहे. वाढत्या उन्हामुळे आणि वाऱ्यांच्या बदलत्या स्थितीमुळे, मुंबईतील काही भागातील हवेचा दर्जा आता समाधानकारक श्रेणीत नोंदवला जात आहे. तर उत्तर भारतात कडाक्याची थंडी असून, दुपारच्या वेळी तापमानात वाढ होऊन सूर्यप्रकाशही दिसू लागला आहे. पूर्वोत्तर भारतात पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाचा अंदाज आहे.