हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होत असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रासह इतर भागांमध्ये ढगाळ वातावरण अन उष्णतेचा त्रास जाणवत असून, पुढील चार दिवस राज्यावर अवकाळी पावसाचं सावट असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना अन बीड या भागांमध्ये येत्या 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता आहे.
ढगाळ वातावरण, पण उष्मा कायम (Weather Update) –
राज्यात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्यप्रकाश कमी झाला असला तरी उष्णतेची तीव्रता कायम आहे. यामुळे नागरिकांनी उष्माघात व थकव्यापासून सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अवकाळी पावसाची शक्यता वाढल्या –
पूर्व बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा काही दिवसांपूर्वी निवळला असला, तरी सध्या राजस्थानच्या पश्चिम भागापासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा नवीन पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे पावसाला अनुकूल वातावरण तयार झालं आहे. याशिवाय तापमानात वाढ झाल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून पावसाच्या शक्यता वाढल्या आहेत.
आरोग्याची घ्या काळजी –
या सततच्या हवामान (Weather Update) बदलांमुळे तापमानात फारसा मोठा बदल नसला, तरी नागरिकांना याचा त्रास जाणवत आहे. अशा वातावरणात ताप, सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांचा त्रास होण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.