Weather Update: महाराष्ट्रातील हवामानात बदल ; मुंबईत गारठा अन् पुण्यात उष्णतेची झळ

0
1
Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – काही दिवसापासून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. पण आता परिस्थिती काहीशी वेगळी आहे. उत्तर भारतात असणारा थंडीचा कडाका काही प्रमाणात कमी होत असतानाच मुंबईतील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. साधारण आठवड्याभरापूर्वी उत्तर भारतातून दक्षिणेच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले होते, ज्यामुळे मुंबईतील थंडी कमी झाली होती. आता मात्र हे अडथळे दूर झाले असून, वाऱ्याचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे. त्यामुळे मुंबईत गारठा (Weather Update)अन् पुण्यात उष्णतेची झळ अनुभवण्यास मिळत आहे.

24 तासांत मुंबईत गारठा (Weather Update)-

या वाऱ्याचा मार्ग खुला झाल्यामुळे नाशिक, ठाणे, नवी मुंबईसह मुंबईच्या दिशेने थंडीची हवा येणार आहे. पुढच्या 24 तासांत मुंबईत गारठा अनुभवता येईल. यामुळे, उष्णतेने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीशी शांतता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्रात, विशेषत: पुणे शहरात, तापमानात वाढ होत आहे. इथे उष्णतेचे प्रमाण अधिक जाणवत आहे आणि पुण्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यात काही ठिकाणी थंडी वाढली असली तरी, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेचा मारा सुरू आहे.

तापमानात 2-4°C घट होण्याची शक्यता –

हवामान विभागाने (Weather Update) 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि पुण्यात किमान तापमानात 2-4°C घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. अशा प्रकारे, राज्यभरातील हवामानात वेगवेगळ्या ठिकाणी थोड्या थोड्या फरकाने बदल होत असून, नागरिकांना हवामानाच्या अनुकूलतेचा अनुभव घेता येईल.