Weather Update: मध्य महाराष्ट्रसह मुंबईला बसणार तापमानाच्या झळा; IMD चा इशारा

0
2
Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – देशातील हवामानात सतत चढ उतार होताना दिसत आहे. येत्या दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच देशाच्या उत्तरेकडील भागांमध्ये पुढील काही दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर, कमाल तापमान 28.8 अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या उत्तर पश्चिमेकडील भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये किमान तापमानात बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे येथून वाहणारे वारेही प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे.

तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता (Weather Update)-

महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून , येत्या काही दिवसात तापमान कसे असणार यामुळे लोक चिंतेत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमान वाढणार (Weather Update) असल्याचा इशारा दिला गेला आहे.

पावसाचा यलो अलर्ट जारी –

जम्मू काश्मीरसह पंजाब, हरियाणा, राजस्थान, आणि पूर्वोत्तर भारतासाठी ढगांच्या गडगडाटाचा यलो अलर्ट (Weather Update) जारी केला आहे. अरुणाचल प्रदेशातही पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसासह जोरदार हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे. देशभरात ऋतू बदलाच्या या सत्रात तापमानात चढ-उतार, वादळी पाऊस, आणि हिमवृष्टीचे संकेत असताना नागरिकांना सतर्कतेसाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.