हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सध्या देशभरातील हवामानाचा प्रभाव दिसून येत आहे. कोलकाता आणि ओडिशा प्रमाणे राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून, त्याचे परिणाम महाराष्ट्रावरही दिसू लागले आहेत. देशभरातील हवामानबदलामुळे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विविध प्रकारचे हवामान पाहायला मिळत आहेत.
महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण ( Weather Update) –
मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागातून चक्राकार वारे वाहत आहेत, ज्यामुळे तामिळनाडूपर्यंत त्यांचा प्रभाव दिसून येत आहे. हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होऊन, वाऱ्यांच्या एकिकरणामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. राज्यात पावसाची परिस्थिती तयार होत असली तरी, काही जिल्ह्यांमध्ये उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या सुस्पष्ट संकेत मिळत असले तरी, गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. विशेषत: विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई शहर व उपनगरांमध्ये उष्मा वाढण्याची शक्यता आहे.
पावसाची शक्यता वर्तवण्यात आली –
देशाच्या उत्तरेकडील पर्वतीय भागामध्ये पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळे, मैदानी भागांमध्ये तापमानवाढ होत आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या माहितीप्रमाणे, गेल्या तीन दिवसांमध्ये देशभरात सरासरी 4 अंशांनी तापमान वाढले आहे. आगामी काही दिवस ही स्थिती कायम राहणार असून, मार्च महिन्यातच देशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने ( Weather Update) दिलेल्या यादीनुसार, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये उष्म्याचा जोर वाढला आहे. अन काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.