Weather Update: IMD चा इशारा ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात गारपिट अन् विजांच्या कडकडाटासह पाऊस

Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – देशातील हवामानात वारंवार चढ उतार होताना दिसत आहेत. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होतोय. महाराष्ट्र्रामध्ये काही भागांमध्ये उष्णतेचा पारा वाढला असून, दुसरीकडे विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा अन पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्याचसोबत काही जिल्ह्याना IMD ने यलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईसह मराठवाडा , कोकण , विदर्भ इत्यादींचे हवामान कसे असणार हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मुंबईसह इतर जिल्ह्याचे हवामान (Weather Update) –

आज मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत कमाल तापमान 29.22°C आणि किमान तापमान 23.99°C राहण्याचा अंदाज आहे. आर्द्रतेचे प्रमाण 54% आहे. मुंबई शहरासोबतच उपनगरांमध्येही ढगाळ वातावरण असेल, अन हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे. यासोबतच विदर्भात गारपिटीची शक्यता आहे. यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपिट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा अन हलका ते मध्यम पाऊस होईल.

ऑरेंज अलर्ट अन ऑरेंज अलर्ट जारी –

अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. पावसाचे वातावरण तयार होणार असताना, कोकणात काही ठिकाणी हलका पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी चिंता निर्माण करणार –

पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा (Weather Update) इशारा अन गारपिटीची शक्यता आहे, ज्यामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामानातील हे अचानक बदल शेतकऱ्यांसाठी चिंता निर्माण करणारे ठरू शकतात. सद्याच्या हवामान बदलांची काळजी घेत, शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.