हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट (आयएमडी) यांच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत भारतातील विविध भागांमध्ये तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या दक्षिण आणि पश्चिम भागांमध्ये उष्मा वाढताना (Weather Update) दिसत आहे. तसेच विदर्भ अन मध्य महाराष्ट्रातही उष्णतेचा तडाखा वाढण्याची संभावना आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
जास्त उष्मा सहन करावा लागणार (Weather Update) –
मुंबईतील तापमान देखील वाढण्याची शक्यता आहे, जिथे नागरिकांना दुपारच्या वेळी जास्त उष्मा सहन करावा लागणार आहे. मुंबईत 34.6°C पर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता आहे, आणि रात्रीचे तापमान 26°C असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुणे येथे 36.6°C आणि रात्रीचे तापमान 17.2°C, जळगावमध्ये 37.7°C आणि 17.0°C, कोल्हापूरमध्ये 37.1°C आणि 21.0°C, निफाडमध्ये 35.7°C आणि 12.0°C, साताऱ्यात 36.7°C आणि 18.4°C, रत्नागिरीमध्ये 33.0°C आणि 21.6°C, तसेच मुंबईत 34.6°C आणि रात्री 26.0°C तापमान राहण्याचा अंदाज आहे.
या ठिकाणी पावसाची शक्यता –
आयएमडीच्या वृत्तानुसार, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये पावसाची (Weather Update) शक्यता आहे. तसेच, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांत गिलगिट, बाल्टीस्तान, लडाख आणि जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांना या बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.