हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – गेल्या काही दिवसांपूर्वी हवामान विभागाने ठराविक भागांना यलो अलर्ट जारी केला होता. यामध्ये पाऊस अन विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हा यलो अलर्ट जारी केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात अचानक पावसाचा तडाखा बसला. यामध्ये सिंधुदुर्ग, गोवा, मिरज, सांगली अन सातारामधील काही शहरात अवकाळी पावसाने झोडपले आहे. या ठिकाणी झालेला पाऊस अन वाऱ्यांच्या लहरींमुळे अनेक जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने पुढील 24 तासामध्ये हवामान कसे राहणार आहे, याबद्दल सांगितले आहे.
पुढील 24 तासातील हवामान कसे असणार( Weather Update) –
महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण ( Weather Update) कायम राहील, पण पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर भागांमध्ये तापमानात वाढ होणार आहे. आगामी 24 तासांत काही सुधारणा होण्याची शक्यता आहे, पण सांगली आणि सोलापूरमध्ये पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे हवामान विभागाने सांगितले आहे.
दक्षिण भारतात हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज –
छत्तीसगड आणि कर्नाटकमधून सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील तापमान ( Weather Update) 38 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये उष्मा वाढत असून, नागरिकांचे आरोग्य गंभीर होऊ शकते. देशभरात उष्णतेची लाट वाढत असून, आयएमडीने दक्षिण भारतात हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. जम्मू काश्मीर अन लडाख भागात पश्चिमी झंझावातामुळे हिमवृष्टीचा इशारा जारी केला आहे. तसेच, एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.