हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – गेल्या काही दिवसांपासून राज्यात किमान तापमानात घट झाली असून, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासात महाराष्ट्रात तापमानात पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसांत कमाल तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र, विदर्भात तीन दिवसांत कमाल आणि किमान तापमान 2 ते 3 अंशांनी घटण्याची शक्यता आहे. यामध्ये काही वेळा किमान तापमानात फारसा बदल होणार नसला तरी, पुढील दोन दिवसांत त्यात बदल होऊ शकतात.
दोन दिवस कडाक्याची थंडी –
हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पंजाब या भागात दोन दिवस कडाक्याच्या थंडीमुळे गारठा जाणवणार आहे. तर दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ मध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होईल, ज्यामुळे राज्यात थंडीसाठी तयार झालेले पोषक वातावरण बदलू शकते.
राज्यात तापमानाची स्थिती (Weather Update) –
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील किमान तापमान घटले असून, कोरड्या व शुष्क वाऱ्यांमुळे पहाटेच्या वेळी गारठा आणि थंडीचा जोर वाढला आहे. पुणे आणि मध्य महाराष्ट्रात किमान तापमान 15 ते 16 अंशांपर्यंत खाली आले आहे. दुसरीकडे, राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात चांगली वाढ पाहायला मिळाली आहे, जसे की कोकणात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यात कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते.
पुढील 48 तासांसाठी हवामान अंदाज –
पुढील दोन दिवस राज्यातील किमान तापमानात (Weather Update) 2 ते 3 अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, उत्तर महाराष्ट्र, मध्य व पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र याठिकाणी कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आकाश निरभ्र राहून तापमानात चढ-उतार होईल. राज्यात सुर्याचे उत्तरायण सुरू असून, दिवस मोठे होत आहेत आणि रात्र छोटी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी दिवसांत हवामानात अधिक बदल होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा : राज्यात थंडीचा जोर वाढणार ; हवामान विभागाचा अंदाज पहाच