हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – सध्या देशभरात हवामानात मोठे चढ उतार होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उन्हाच्या झळा , यामुळे लोकांच्या समस्या वाढणार आहेत. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, पूर्वोत्तर भारतात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उत्तर भारतात उष्णतेचा कहर वाढत चालला आहे. तर हवामान विभागाने (Weather Update) काही दिवस राज्यातील हवामान कसे असेल , याची माहिती सांगितली आहे. काही भागात ढगाळ वातावरणामुळे लोकांना उकाड्यापासून विश्रांती मिळाली आहे.
यलो अलर्ट जारी (Weather Update) –
एप्रिल महिन्याच्या अखेरीस मुंबई शहर अन उपनगरांमध्ये तापमानात काही प्रमाणात घटले आहे. त्यामुळे सध्या ढगाळ हवामानामुळे उकाड्यातून थोडा दिलासा मिळाल्याची भावना मुंबईकरांमध्ये आहे. यासोबत विदर्भातील अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम अन यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमानात काही अंशांनी घट झाली असून, वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना अन विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काही जिल्ह्यांमध्येही तापमानात घसरण
पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हवामान (Weather Update) कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, काही भागांमध्ये कमाल तापमानात 1 ते 2 अंशांची घट होऊ शकते. कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा आणि सोलापूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही तापमानात घसरण होणार आहे. तर मराठवाड्यातील धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी अन बीडमध्ये सध्या तापमानाचा पारा चाळीशीपार गेला असून, 42 ते 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.




