हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल दिसून येत आहे , यामध्ये कधी पाऊस तर कधी जास्त उष्णता असे चित्र पाहण्यास मिळाले. यासाठीच भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील वातावरणाचा अंदाज जाहीर केला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार उत्तरेकडील राज्यांमध्ये हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर मध्य आणि दक्षिण भारतात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर काही भागात तीव्र उष्णता असणार आहे. चला तर या हवामान विभागाच्या अंदाजाची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात पावसाचा इशारा (Weather Update) –
महाराष्ट्रात एकीकडे उन्हाचा तडाखा बसत असतानाच, दुसरीकडे काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील विदर्भ भागात तापमानात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने, अवकाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात काही भागात पावसाचा इशारा जारी करण्यात आला असून, येत्या दोन ते तीन दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषत: कोकण क्षेत्रात अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अन मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये ढगाळ वातावरण असण्याचीही शक्यता आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन –
विदर्भ, मराठवाडा अन उत्तर महाराष्ट्रात तापमानवाढ (Weather Update) होत असल्याने, दक्षिण महाराष्ट्र आणि केरळ भागात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. कर्नाटकमध्ये सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक भागात बाष्पीभवन प्रक्रिया चालू आहे, ज्यामुळे उकाड्यात वाढ होण्यासोबतच अवकाळी पावसाचे वातावरण तयार होत आहे. तसेच ओडिशा आणि आसपासच्या क्षेत्रांमध्ये आयएमडी (Indian Meteorological Department) ने उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा जारी केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हा उष्णतेचा लाटेचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार, या स्थितीमुळे महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागांमध्ये काही वेळा पाऊस, ढगाळ वातावरण आणि उकाड्यात वाढ होईल.