Weather Update: राज्यात पावसाच्या सरी, तापमानात वाढ; काय आहे IMD चा अंदाज

Weather Update (10)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – हवामान विभागाने (IMD) देशभरातील हवामानाचा प्राथमिक अंदाज जाहीर करताना उत्तर भारतात पावसाच्या सरी, तर महाराष्ट्रात तापमानातील अनपेक्षित घसरण याची नोंद घेतली आहे. त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महाराष्ट्राच्या उत्तर भागांमध्ये उष्णतेची लाट कायम असली तरी, विदर्भात मात्र तापमानात लक्षणीय घट झाली आहे. तर काही भागात पावसाची सरी पाहण्यास मिळणार आहे.

24 तासांमध्ये वादळी पावसासह वाऱ्यांची शक्यता (Weather Update)

हवामान खात्यानुसार, पूर्व विदर्भात येत्या 24 तासांमध्ये वादळी पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता असून, यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा विभागात उष्ण अन दमट हवामानाची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलं आहे. तसेच राज्यातील अनेक भागांत तापमानात घसरण झाली आहे. कोकण, मुंबई, उपनगर आणि पालघरमध्ये पहाटेच्या सुमारास पावसाळी ढगांची दाटी आणि गारवा जाणवतो आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उष्णतेचा मारा अजून कायम –

तापमानात (Weather Update) घट असली तरी परभणी, अकोला, वाशिम अन ब्रह्मपुरी येथे पारा 41 ते 42 अंशांदरम्यान असून, बुलढाणा जिल्ह्यात तापमान 40 अंशांवर नोंदवले गेले आहे. त्यामुळे काही भागांत उष्णतेचा मारा अजून कायम आहे. राज्यातील काही भागांत सध्या दिलासादायक गारवा जाणवतो असला तरी काही जिल्ह्यांतील उष्णता आणि येत्या दिवसांत हवामानात होणाऱ्या बदलांवर नागरिकांचे लक्ष राहणार आहे.