हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. मुंबईत तापमान 36 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले, ज्यामुळे उकाड्याची लाट निर्माण झाली आहे. ही वाढ होत असतानाच, हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने सांगितले की, मुंबईसह ठाणे अन पालघर जिल्ह्यात पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाचा यलो अलर्ट जारी (Weather Update) –
हवामान विभागाने 31 मार्च रोजी सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, रायगड, रत्नागिरी, मुंबई, जळगाव, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अन बीड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागांत पूर्व मोसमी पावसाचा अंदाज आहे. ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे वारे 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता –
अवकाळी पावसामुळे (Weather Update) रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पिकांची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू असताना, हलक्या ते मध्यम पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य उपाययोजना करण्याचे आव्हान केले आहे, तसेच वातावरणातील बदलामुळे तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना सतर्क राहून आपल्या पिकांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे.
नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ –
तापमानात वाढ (Weather Update) झाल्यामुळे मुंबईतील नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उकाड्यामुळे नागरिकांमध्ये चक्कर येणे, पित्ताचा त्रास आणि अन्य समस्या वाढत आहेत. नागरिकांनी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




