हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – गेल्या अनेक दिवसांपासून हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. या बदलामुळे नागरिकांच्या जीवनमानावर परिमाण झाले आहेत. एकीकडे उन्हाचा तडाका अन दुसरीकडे पाऊसाचा जोर. त्यामुळे गेल्या 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, येत्या 24 तासांमध्ये हे चित्र असेच पाहण्यास मिळणार आहे. यासाठी हवामान विभागाने नागरिकांना इशारा दिला आहे. तर काही भागामध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर चला या हवामान विभागाच्या अंदाजाबद्दल अधिकपणे जाणून घेऊयात.
यलो अलर्ट जारी –
IMD ने काही राज्यात जोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे. नव्या अन तीव्रतेने सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यावर अवकाळी पावसाचा प्रभाव दिसून येत आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये 38 ते 39 अंश सेल्सियसपर्यंत तापमान कमी झाले आहे. तसेच हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ या सर्व भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचसोबत मराठवाडा अन मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
पावसाचा अन गारपिटीचा इशारा –
पुढील 24 तासांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, नाशिक यांसारख्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अन गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या वादळी पावसामुळे विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे, असा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अलर्टनुसार, नागरिकांनी पावसामुळे होणाऱ्या संभाव्य धोके आणि उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासापासून काळजी करणे गरजेचे आहे.




