हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – संपूर्ण महाराष्ट्र हवामानाच्या दोन अवस्थेत सापडला आहे. एकीकडे अवकाळी पाऊस अन दुसरीकडे उकाडा. या परिस्थितीमुळे लोकांची चिंता वाढली आहे. पण आता हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात उष्णता वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच दोन ते तीन दिवस उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे काही दिवसातच तापमानात मोठी वाढ दिसून येणार आहे. तर येत्या काळात कसे वातावरण असेल, त्याचा लोकांवर काय परिमाण होईल हे आज आपण जाणून घेणार आहोत.
एप्रिल महिन्यात उष्णता वाढणार (Weather Update) –
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा एप्रिल महिन्यात उष्ण लाटेची तीव्रता अधिक असू शकते. म्हणजेच देशातील ठराविक भागात एप्रिल ते जून या उन्हाळी हंगामात उष्णतेचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना उष्णेतेचा सामना करावा लागणार आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात यांचा प्रभाव जास्त जाणवू शकतो. तसेच, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागातही उष्ण लाटांचा सामना करावा लागू शकतो. राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना कडक उन्हाच्या दाहकतेपासून वाचण्यासाठी अधिक खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान –
महाराष्ट्रात (Weather Update) काही दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले आहे . यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले . ढगांच्या कडकडासह पाऊस पडल्याने काही ठिकाणी पिकांची नासाडी झाली आहे. तर, काही वेळ पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा दिला. पण आता पुन्हा एकदा उष्णतेचा प्रभाव जाणवून येणार आहे. तसेच हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार आज ( 5 एप्रिल ) रोजी मुंबईत अति उष्णता पाहण्यास मिळणार आहे. तर काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. यावर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, अन येत्या काळात चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावाने पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.