Weather Update: महाराष्ट्रात पुढील 24 तासात उष्णतेचा इशारा; ‘या’ भागांत कडक ऊन

Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यामुळे अनेक भागातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. पण आता हि परिस्थिती उलटी होताना दिसणार आहे. राज्यातील विदर्भ , कोकण क्षेत्रात तापमान वाढत निघाले आहे. याच कारणांमुळे कोकणासाठी दमट हवामानाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तर काही भागांना उष्णतेपासून विशेष काळजी घेण्याचे आव्हान देण्यात आले आहे. तर पुढील 24 तासात हवामान कसे असणार आहे , याचा अभ्यास आज आपण करणार आहोत.

या ठिकाणच्या तापमानात वाढ (Weather Update) –

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जळगाव, नाशिक, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा अन छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . तसेच हवामानशास्त्र विभागाने अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील दोन-तीन दिवसांत राज्यातील कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पण यासाठी सर्व नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.

मुंबईतील तापमानात चढ-उतार –

आताची परिस्थिती पाहता मुंबईतील तापमानात (Weather Update) चढ-उतार होण्याची शक्यता आहे. शहरातील तापमान 32 ते 34 अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच, हवामान विभागाच्या अंदाजानुसार 10 एप्रिलनंतर राज्यावर अवकाळीचे सावट पुन्हा दिसू येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या अंदाजानुसार राज्यातील काही भागात विजांचा कडकडाट, सोसायट्याचा वारा अन वादळी हवामान निर्माण होऊ शकते. यामुळे यंदाच्या आठवड्याच्या सुरूवातीला उकाडा असला तरी, आठवड्याचा शेवट अवकाळी पावसाने होऊ शकतो.