हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – फेब्रुवारी महिना सुरु असून आता उष्णेतेचा पारा दिवसेन दिवस वाढताना दिसत आहे. उत्तरेकडील राज्यात थंडीमध्ये चढ उतार होतायत. याचसोबत भारत आणि महाराष्ट्रामध्येही तापमानात मोठे बदल होत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासात उष्णतेचा पारा अजून वाढण्याची शक्यता आहे. तर चला या हवामान विभागाच्या अंदाजाविषय सविस्तरपणे जाणून घेऊयात.
तापमानात वाढ (Weather Update)-
माहितीनुसार राज्याच्या विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र क्षेत्रासह कोकणातही दिवसा उष्णता वाढणार आहे. पूर्वेकडून मुंबईकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे आठवड्याच्या शेवटी तापमानाचा आकडा 35 अंशांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्याचसोबत मुंबईमध्ये तापमान 37 अंशांचा आकडा वाढणार असून , यामुळे नागरिकांना विविध अडचणींनी सामोरे जावे लागणार आहे. मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या वतीनं लोकांना इशारा दिला आहे. या तापमानासोबतच मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, पालघर इथलही उष्णता (Weather Update)वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाचा इशारा –
राज्यातील कोकण क्षेत्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड किमान तापमान (Weather Update) सरासरीपेक्षा जास्त असेल. तर पालघरमध्ये तापमान 36 अंशांवर पोहोचेल असंही हवामान विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळं ऐन दुपारच्या वेळी बाहेर पडू नका , आणि जर पडला तर विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. ही परिस्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असून, त्यानंतर तापमानवाढीचा वेग मंदावेल असं सांगण्यात येत आहे.