Mumbai Local : मुंबईतील लोकल म्हणजे मुंबईची लाईफलाईन. दररोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. मात्र उष्ण हवामान आणि लोकलची गर्दी यामुळे हा प्रवास गुदमरलेला होऊन जातो. मात्र आता मध्य रेल्वे कडून यावर तोडगा काढण्यात येत असून मध्य रेल्वेला लवकरच एक एसी लोकल ट्रेन मिळणार आहे. ही ट्रेन मध्य रेल्वेवर धावणाऱ्या सध्याच्या एसी लोकल ट्रेनपेक्षा वेगळी असेल. या ट्रेनची काही मशीनरी बोगीच्या खाली असेल ज्याला अंडरस्लंग म्हणतात. अशी ट्रेन पश्चिम रेल्वेवर (Mumbai Local) धावत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन रेक फेब्रुवारी 2025 मध्येच मिळेल. यामुळे पश्चिम रेल्वेकडे एकूण 7 एसी रेक होतील.
आधी होणार चाचणी (Mumbai Local)
मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रेक मुंबईत पोहोचल्यानंतर काही महिने त्याची चाचणी होईल. कारण, मध्य रेल्वेच्या सध्याच्या एसी रेकपेक्षा ही वेगळी रेक आहे, त्यामुळे चाचणी आवश्यक आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, अंडरस्लंग ट्रेनमध्ये मशीनरी बोगीच्या खाली असल्यामुळे पावसाळ्यात समस्या येऊ शकतात. मध्य रेल्वेचे ट्रॅक पश्चिम रेल्वेच्या तुलनेत थोडे खाली आहेत आणि येथे पावसाळ्याच्या दिवसात पाणीही लवकर भरते. अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत मध्य रेल्वेद्वारे अशा प्रकारची लोकल चालवणे टाळले जात होते. सध्या, त्याच प्रकारचा रेक उपलब्ध असल्याने आता तो मध्य रेल्वेवर आणला जात आहे. अंडरस्लंग ट्रेनमध्ये सामान्य ट्रेनच्या तुलनेत जास्त जागा असल्यामुळे प्रवाशांच्या बसण्याची क्षमता (Mumbai Local) जास्त असते.
6 महिन्यांनंतर वाढणार सेवा (Mumbai Local)
नवीन रेकची चाचणी झाल्यानंतर मध्य रेल्वेवर एसी लोकलची संख्या वाढेल. यात सुमारे 6 महिन्यांचा वेळ लागू शकतो. सध्या मध्य रेल्वेवर 66 एसी लोकल सेवा चालतात. सूत्रांनी सांगितले की, सामान्य लोकलच्या ऐवजी एसी लोकल चालवली जाईल. सध्या मध्य रेल्वेकडे एकूण 6 रेक आहेत. त्यापैकी दोन रेक पीरिओडिक ओवरहॉलिंगसाठी गेले आहेत म्हणजे 4 रेकद्वारे 66 सेवा चालवल्या जात आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन रेक मिळाल्यानंतर एक रेक नेहमी राखीव ठेवण्याची योजना आहे. सध्या मध्य रेल्वेच्या एसी लोकलमध्ये दररोज सरासरी 90 हजार लोक प्रवास करतात