हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट पसरली असून, तापमानात मोठी वाढ झाली आहे. या तापमानातील वाढीमुळे लोकांची चिंता वाढली आहे. राज्यातील इतर ठिकाणांसह उष्णतेत प्रचंड वाढ झालेली दिसून येत आहे. राज्यातील विशेषतः विदर्भ भागामध्ये, तापमान खूपच वाढले आहे. तसेच अकोल्यात तापमान 44 अंशांवर पोहचले असून, चंद्रपूरात 43.6 अंशांवर तापमान पोहोचले आहे. हिंगोली अन परभणीतील तापमानही 41 अंशांवर गेले आहे. या उष्णतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उष्णतेचा यलो अलर्ट जारी (Weather Update) –
हवामान विभागाने राज्यातील तापमानाची स्थिती पाहता उत्तर महाराष्ट्र, विदर्भ अन कोकण मध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई अन उपनगरांमध्येही दमट हवामानामुळे तापमानाचा दाह 40 अंशांपर्यंत जाणवत आहे. दुपारच्या वेळी उकाडा आणखी तीव्र होत असल्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसात नागपूर मध्ये तापमान 45 अंशांच्या पलीकडे जाऊ शकते, अन पश्चिम विदर्भातील अकोला आणि आसपासच्या जिल्ह्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
उष्णतेच्या लाटेचा सामना –
हवामान विभागाने (Weather Update) नागरिकांना उष्णतेपासून संरक्षण घेण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी उष्णतेच्या लाटेचा सामना करत असलेल्या गरम हवामानात विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.