हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – गेल्या काही दिवसापासून हवामानात बदल होत आहे. याच हवामानातील चढ उतारामुळे लोक चिंतेत पडले आहेत. आता हवामान विभागाने मार्चमध्ये अजून उष्णतेचा पारा वाढणार आल्याचे सांगितले आहे. हे तापमान (Weather Update) 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी या उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे हवामान विभागाने सांगितले आहे. याचसोबत महाराष्ट्राकडे येणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलली आहे , याचा परिणाम काही भागांवर होताना दिसणार आहे.
बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त (Weather Update) –
सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त नोंदवले जात आहेत. त्यामुळे कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 35 ते 39 अंश सेल्सिअस तापमानाची (Weather Update) नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे विदर्भात तापमान सतत वाढत असल्याचं दिसत आहे. जर तापमान पाहिले तर , कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांमध्ये तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या किनारपट्टी भागावर पूर्वेकडून येणारे वारे अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे काही भागांमध्ये उष्ण वातावरण राहणार असल्याचे सांगितले आहे.
उष्णतेच्या लाटेने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम –
महाराष्ट्राच्या हवामानात (Weather Update) होणाऱ्या या बदलांमुळे नागरिकांना सध्या दुपारच्या वेळी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. मुंबईमध्ये विशेषतः उन्हाची झळ दुपारच्यावेळी तीव्र होत असल्याचं दिसत आहे. सांगलीमध्ये तापमान 2 अंशांनी कमी झालं असून, 38 अंश पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर सोलापूरमध्ये तापमान 37 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि इतर भागांमध्येही तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याप्रकारे मार्च महिन्यातील उष्णतेच्या लाटेने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागरिकांनी उष्णतेच्या झळांपासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, अशी सूचनाही हवामान खात्याने केली आहे.