Weather Update | ऐन हिवाळ्यात पुन्हा राज्यात कोसळणार पाऊस; हवामान विभागाने दिला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | संपूर्ण राज्यामध्ये कडाक्याची थंडी पडलेली आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उद्या म्हणजे 21 डिसेंबर रोजी राज्यातील 4 ते पाच 5 जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील कांद्याची काढणी चालू झालेली आहे. तसेच रब्बी हंगामातील कांद्याची लागवड करण्याच्या शेतकरी तयारीत आहे. अशातच आता हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. हा पाऊस झाला तर शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहे.

भारतीय हवामान विभागाला दिलेल्या अंदाजानुसार आज म्हणजेच 20 डिसेंबर रोजी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथाच्या परिसरावर पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तसेच पुण्याच्या वेधशाळेने देखील पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यामुळे उद्या राज्यातील जवळपास चार ते पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. 20 डिसेंबर रोजी कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे आज 20 तारखेला पुण्यामध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेत पिकाचे नियोजन शेतकऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घेऊनच करावे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 21 तारखेनंतर पाऊस सुरू होणार आहे. 21 ते 26 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडू शकतो. असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केलेला आहे.