Weather Update | संपूर्ण महाराष्ट्रात आता परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्र विविध ठिकाणी पाऊस पडत आहेत. पंजाबराव डख यांनी हवामानाबद्दल अंदाज वर्तवला होता. आणि तो अंदाज खरा ठरलेला आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरच्या सायंकाळपासून पावसाला सुरुवात होणार होती. आणि त्या दिवसापासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. 9 ऑक्टोबर रोजी सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, हिंगोली या भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे.
त्याचप्रमाणे पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील पावसाला सुरुवात झालेली आहे. कालपासून उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस पडलेला आहे. यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडताना दिसत आहे. परंतु हा परतीचा पाऊस महाराष्ट्रात आणखी किती दिवस राहणार आहे? हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे.
परतीच्या पाऊस (Weather Update) महाराष्ट्रात किती दिवस राहणार आहे. याबद्दलचा अंदाज देखील पंजाबरावांनी सांगितलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 9 ते 18 ऑक्टोबरदार पावसाची शक्यता आहे. या काळात दररोज हवामानामध्ये बदल होताना दिसणार आहे. तसेच हा परतीचा शेवटचा पाऊस असणार आहे. त्यामुळे पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा असे आव्हान देखील करण्यात आलेले आहे
या परतीच्या पावसाचा (Weather Update) रब्बी हंगामातील गहू, हरभरा यांसारख्या पिकांना मात्र फायदा होणार आहे. या पावसामुळे गहू, हरभरा यांना चांगला ओलावा मिळणार आहे. आणि पिकांच्या वाढीसाठी फायदेशीर होणार आहे. 9 ते 18 ऑक्टोबर दरम्यान नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता जास्त असणार आहे.