Weather Update | महाराष्ट्रात येणार थंडीची लाट; पंजाबराव डख यांनी दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांनी एक नवीन हवामानाबद्दल अंदाज दिलेला आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात थंडीची लाट येणार आहे. त्यामुळे येत्या दहा ते बारा दिवसात महाराष्ट्रात जबरदस्त थंडी असणार आहे. सध्या पाऊस कुठेही पडणार नसल्याने शेतकऱ्यांनी काळजी करू नये. असे त्यांनी सांगितलेले आहे. तसेच शेतीच्या पुढील कामांना सुरुवात करण्यास देखील सांगितलेले आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी कांदे काढणीचे काम सुरू होते. परंतु पावसाचा अंदाज असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढला नाही. परंतु आता राज्यात पाऊस येणार नाही. कांदा काढण्यासाठी महाराष्ट्रातील वातावरण पोषक आहे, असे त्यांनी सांगितले आहे. सध्या महाराष्ट्रात जरी पाऊस पडणार नसला, तरी 13 आणि 14 डिसेंबर रोजी कमी तिरुपती आणि तमिळनाडूमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच 17 आणि 18 तारखेला देखील जोरदार पाऊसाची शक्यता आहे. त्यामुळे जर कोणीही तिरुपती बालाजीला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर आधी पावसाचा अंदाज घ्या, नंतरच तुमच्या नियोजन करा.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार आता उत्तर महाराष्ट्र, मराठवाडामध्ये महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पाऊस येणार आहे. तसेच विदर्भातील देखील पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील दहा ते बारा दिवस महाराष्ट्रात हवामान कोरडे असणार आहे. आणि थंडीची तीव्रता वाढणार आहे. परंतु ही थंडी वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांना याचा फायदा होणार आहे. परंतु द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीपासून द्राक्षांचे संरक्षण करावे.