Weather Update | गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच पाऊस कोसळताना दिसत आहे. जुलैच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात चांगली हजेरी लावलेली आहे. 1 जुलै ते 20 जुलै या दरम्यान पावसाची खूप चांगली नोंद झालेली आहे.
भारतीय हवामान विभाग (Weather Update) देखील हवामानाबद्दलचा अंदाज रोज व्यक्त करत असतात. अशातच आता हवामान विभागाने अंदाज लावलेला आहे. ती म्हणजे पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात चांगलाच मुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबईत देखील शुक्रवारपासून पाऊस चांगलाच पडत आहे. मुंबई, ठाणे, वसई त्याचप्रमाणे विरारमध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. नागपूरमध्ये देखील गेल्या दोन-तीन दिवसात चांगलाच पाऊस झालेला आहे. आणि हाच पावसाचा जर पुढील तीन ते चार दिवस सारखा राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे.
सध्या बंगालचे उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले असे दिसत आहे. मुंबई सह राज्यातील इतर भागांमध्ये देखील सुद्धा मुसळधार पाऊस (Weather Update) पडत आहे. आणि पुढील दोन ते तीन दिवस हा पावसाचा राहणार आहे यावेळी हवामान विभागाने आता काही जिल्ह्यांना ऑरेंज कलर देखील जारी केलेला आहे. तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता रायगड, रत्नागिरी, सातारा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या भागांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूर या भागांना येलो अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक भागांमध्ये देखील पावसाचा अलर्ट जारी केलेला आहे.