Weather Update | सर्वत्र दिवाळीला सुरुवात झालेली आहे. आणि दिवाळीच्या तोंडावर राज्यात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील तीन दिवस पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस वादळी वाऱ्यासह येणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
दिवाळी हा सण आपल्या भारतामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. परंतु या येणाऱ्या पावसामुळे दिवाळी हा सण लोकांना नीट साजरा करता येणार नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 30 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे.
त्याचप्रमाणे 31 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सोलापूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येल्लो अलर्ट केलेला आहे.
त्याचप्रमाणे 1 नोव्हेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, परभणी, बीड, या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यात पाऊस जरी अधून मधून येत असला, तरी थंडीला सुरुवात झालेली आहे. वातावरणात बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे हवामान कोरडे झालेले असून सकाळी आणि रात्री थंडी पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे.