Weather Update | यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी सप्टेंबर महिन्यात आता संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पाऊस होता. परंतु त्यानंतर पावसाने थोडे विश्रांती घेतली आहे. परंतु आता पुन्हा एकदा परतीचा पाऊस येणार असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितलेले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊसाची (Weather Update) शक्यता वर्तवण्यात आलेली होती. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यात 2 टक्के एवढा पाऊस नोंदवल्या गेलेला आहे. तसेच मराठवाडा पूर्व विदर्भ आणि कोकण विभागात देखील 12 जिल्ह्यांमध्ये या महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला. परंतु आता सप्टेंबर महिना देशातील बहुतांश भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
देशातील तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ईशान्येकडील राज्य लढाख हा भाग वगळता इतर सगळ्या राज्यांमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता सप्टेंबर महिन्यात वर्तवण्यात आलेली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात पुढील तीन आठवड्यात कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्यात जास्त पाऊस पडेल आणि परतीच्या पावसाचा प्रवास देखील थोडा उशिरा सुरू होईल असे सांगण्यात आलेले आहे. परंतु या परतीच्या पावसाचा परिणाम शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन यांसारख्या पिकांवर होणार आहे. परंतु रब्बी हंगामातील हरभरा, वाटाणा, मसूर यांसारख्या पिकाला ओलावा मिळाल्याने या पिकांना मात्र त्याचा फायदा होणार आहे. आता आपण ऑगस्ट महिन्यात किती पाऊस (Weather Update) पडला हे जाणून घेणार आहोत.
ऑगस्ट महिन्यातील पाऊस | Weather Update
ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण देशाच्या सरासरीच्या 146 टक्के पाऊस पडलेला आहे. यातील कोकण विभागामध्ये 97 टक्के पाऊस पडलेला आहे. मध्य महाराष्ट्रात 53% पाऊस पडलेला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भ यांच्यामध्ये अनुक्रमे 85 आणि 77 टक्के पाऊस पडलेला आहे.
1 जून ते 31 ऑगस्ट पर्यंतचा पाऊस
देशात 1 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या 107% पाऊस पडलेला आहे. तसेच राज्यात 126 टक्के पाऊस पडलेला आहे. यामध्ये कोकण विभागांमध्ये सरासरीपेक्षा 30 टक्के जास्त पाऊस पडलेला आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 51 टक्के पाऊस पडलेला आहे. मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा 15% जास्त पाऊस पडलेला आहे. तर विदर्भामध्ये देखील सरासरीपेक्षा 16 टक्के जास्त पाऊस पडलेला आहे. यावर्षी संपूर्ण देशात जास्त पाऊस पडलेला आहे. आणि आता दिवाळी, दसरा आणि गणपतीच्या सणांच्या तोंडावर देखील संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.