Weather Update | सध्या संपूर्ण देशात नवरात्रीची धामधूम सुरू झालेली आहे. दसरा देखील अगदी तोंडावर आलेला आहे. आणि अशातच संपूर्ण राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबईत देखील जोरदार पाऊस झालेला आहे तसेच रात्री नऊ वाजल्यापासून मुंबईतील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे. आणि पाणी देखील साठलेले आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक देखील ठप्प झालेली आहे.
त्याचप्रमाणे आता दसरा आलेला आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी मुंबईसह इतर अनेक राज्यांमध्ये राजकीय नेत्यांचा दसरा मेळावा असतो. परंतु आता या दसरा मेळाव्यावर पावसाचे संकट आलेले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उद्धव ठाकरे हे मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आझाद मैदानावर दसरा मेळावा घेणार आहे. परंतु आता हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे राजकीय नेत्यांच्या या कार्यक्रमावर देखील त्याचा परिणाम होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची (Weather Update) शक्यता आहे. सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये मुख्यतः कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग मराठवाडा या भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
मुंबईमध्ये सर्वात जास्त पाऊस झालेला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झालेली आहे. त्याचप्रमाणे ठाणे, मुलुंड, कुर्ला, घाटकोपर, दादर, वरळी, अंधेरी, वांद्रे या ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे. आणि पुढील काही तासांमध्ये या ठिकाणी आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.
हवामान विभागाने आज 11 ऑक्टोबर रोजी 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलेला आहे. यामध्ये अनेक जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईसह पूर्व उपनगर, नवी मुंबई, रायगड यांसारख्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.