Weather Update | संपूर्ण महाराष्ट्रात परतीचा पाऊस चालू झालेला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये या पावसाने चांगलं धुमाकूळ घातलेला आहे. अशातच हवामान विभागाने नवीन माहिती दिलेली आहे. त्या माहितीनुसार हा परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज देखील महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये आज कोकण, गोवा, विदर्भ, मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
आज विदर्भात तसेच कोकण गोव्यात मध्य महाराष्ट्र देखील अनेक ठिकाणी पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. तसेच उद्या देखील महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, कोकण या भागांमध्ये देखील आज पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच गोव्यातील अनेक ठिकाणी पाऊस (Weather Update) पडणार आहे त्याचप्रमाणे विदर्भातील बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील मेघगर्जनेसस मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामाना विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील दोन दिवस हवामान ढगाळ असणार आहे.