Weather Update | हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असतो. महाराष्ट्रात दमदार बॅटिंग केल्यानंतर आता पाऊस चांगलाच रजेवर जाणार आहे. हवामान विभागाने मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दिला असला तरी दुसरीकडे ऊन पसरताना दिसत आहे. काही ठिकाणी पाऊस पडणार आहे, तर काही ठिकाणी मात्र कडक उन्हाचा चटका आपल्याला सहन करावा लागणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तास कोकण, सातारा, कोल्हापूर आणि पुण्याच्या घाटमाथ्यावरील भागांमध्ये जोरदार पाऊस (Weather Update) कोसळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये देखील आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रामध्ये देखील तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.
इथून पुढे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस (Weather Update) कमी होताना दिसणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांना चांगलाच उन्हाचा चटका बसणार आहे. परंतु विश्रांतीवर असला तरी कमी अधिक प्रमाणात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच परतीच्या पावसासाठी देखील मान्सून सज्ज झाला आहे
मानसूनी वाऱ्यांचा प्रभाव असणारा कमी दाबाचा पट्टा हा अमृतसरपासून ते बंगालचे उपसागरापर्यंत आहे. तसेच गुजरात पासून ते कर्नाटकपर्यंत देखील कमी दाबाचा पट्टा आहे. त्याचा परिणाम हा राज्यातील हवामानावर झालेला पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचे परिणाम कमी झाले आहे. त्यामुळे तापमानात देखील हळूहळू वाढ होणार आहे. म्हणजेच नागरिकांना आता सामना करावा लागणार आहे. तसेच अधून मधून पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.