Weather Update | पुणे, मुंबईसह आज या भागात कोसळणार पाऊस; IMD ने दिला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | संपूर्ण राज्यात सध्या परतीचा पाऊस चालू झालेला आहे. आणि पुढील काही दिवस हा पाऊस चालू राहणार आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडताना दिसत आहे. पुढील काही दिवसात देखील हा पाऊस राहणार आहे. रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, पुण्यासह पुढील काही दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे. हवामान विभाग रोज पावसाबद्दल माहिती देत असते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट देखील दिलेला आहे.

पुण्यातील वेधशाळेने देखील हवामानाबद्दल अंदाज वर्तवला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये देखील ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच कोकणच्या किनारपट्टीवर देखील मेघ गर्जनेनुसार मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

त्याचप्रमाणे मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडीसा आणि महाराष्ट्राच्या काही भागात देखील पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. त्यापुढे दोन दिवस भारताच्या अनेक उर्वरित भागांमध्ये परतीचा पाऊस येण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र आग्नेय बंगालच्या उपसागरावर असल्याने उद्यापर्यंत ते सक्रिय असणार आहे. त्यामुळे कोकणातील तसेच गोव्यातील बऱ्याच भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.