Weather Update | राज्यामध्ये मान्सून दाखल झालेला आहे. मागील आठवड्यामध्ये पावसाने सगळीकडे जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर काही दिवस पावसामध्ये खंड पडलेला दिसून आलेला आहे. अशातच आता पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर पुढील काही दिवस चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आता राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या दोन दिवसात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
तसेच आज म्हणजेच 16 जून आणि पुढील दोन दिवस जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 20 जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रात (Weather Update) वेळेआधीच मान्सून दाखल झालेला आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबई यानंतर मान्सूनने विदर्भ आणि मराठवाड्यात चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये सध्या पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पुढील दोन दिवसात पाऊस चांगला पडणार आहे.
या ठिकाणी येल्लो अलर्ट जारी | Weather Update
आज म्हणजे 16 जून 2024 रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस या ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे काही भागांना येल्लो अलर्ट देखील हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. 17 आणि 18 जून रोजी कोकणात रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे.