Weather Update | मुंबई, ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे. आणि या वर्षी पावसाचा संकट अजूनही कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस चालू झालेला आहे. आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसत आहे. काही ठिकाणी तापमानात देखील वाढ होत आहेत. मुंबईमध्ये कमाल तापमान हे 32 डिग्री सेल्सिअस एवढे आहे. तसेच ठाण्यात मात्र हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात ऊन सावलीचा खेळ हा चांगला चालू झालेला आहे. हवामान विभाग या पावसाबद्दल नेहमी सर्वांच्या अंदाज व्यक्त करत असतात. अशातच हवामान विभागाने या पावसाबद्दल माहिती दिलेली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये या आठवड्याच्या शेवटपर्यंत चांगलाच पाऊस (Weather Update) पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे कोकणात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोकणामध्ये भात कापणीला आलेले आहेत. त्यातच हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली दिसत आहे.

कोकणासोबतच नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात देखील पुढचे दोन दिवस पावसाचे वातावरण राहणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने या विभागांना अलर्ट दिलेला आहे. या ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने हे वारे वाहणार आहेत. तसेच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हा पाऊस येणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.

सध्या जालना, परभणी, हिंगोली या भागामध्ये पावसाचे स्वरूप थोडेसे कमी आहे. परंतु विकेंडपर्यंत हा पाऊस चांगलाच वाढणार आहे. 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी हवामान विभागाने गेलो आहे. यावर्षी पाऊस सरासरी खूप पेक्षा जास्त झाला. त्यामुळे सोयाबीन पिकाला देखील या पावसाचा खूप जास्त झटका बसणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन या पिकांना त्याचा फटका बसला होता. परंतु आता परतीचा पाऊस देखील वाढल्याने पुन्हा एकदा पिकांना याचा फटका बसत आहे.