Weather Update | पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्याना दिला येलो अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | संपूर्ण देशात आता परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झालेला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. परंतु महाराष्ट्रातील आणखी पुढील तीन दिवस मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभाग हे पावसाबद्दलचा अंदाज नेहमीच व्यक्त करत असतात. हवामानाने आज देखील म्हणजे 18 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामान कसे असेल? तसेच इथून पुढे तीन दिवस राज्यातील हवामान कसे असेल? याची माहिती दिलेली आहे. महाराष्ट्रातील नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, कोकण, जालना या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत आहे. तर काही भागात नागरिकांना पावसाचा सामना करावा लागत आहे आणि यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या देखील वाढलेले आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस राहणार आहे. तसेच 23 ऑक्टोबरला मराठवाड्यात देखील पाऊस (Weather Update) पडणार आहे. त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत संपूर्ण मान्सून जरी केला असला, तरी 5 नोव्हेंबर पासून राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे.

हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची काळजी घेण्यास देखील सांगितलेली आहे. कारण सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांना या पावसाचा चांगलाच फटका बसत आहे. आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.