Weather Update | राज्यातील अनेक ठिकाणी सध्या परतीचा पाऊस चालू झालेला आहे. परंतु अनेक ठिकाणी मात्र कड्क उन्हाचे वातावरण दिसत आहे. मुंबईसारख्या ठिकाणी उन्हाचे तापमान वाढलेले आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून मुंबईमध्ये चांगली तापमान वाढ झालेली आहे. परंतु सध्या मुंबईत देखील ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह मुंबईमध्ये पाऊस देखील झालेला आहे. त्यामध्ये नागरिकांना गरमीपासून सुटका मिळालेली आहे. परंतु आता पुढील दोन दिवस मुंबईमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळे मुंबईतसेच ठाणे, पालघर या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर महिन्यात मुंबई, कोकण तसेच गोव्याच्या किनारी मुसळधार पाऊस कधी पडत आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये आतापर्यंत गोव्यामध्ये तब्बल 110% जास्त पाऊस पडलेला आहे बतसेच संपूर्ण महाराष्ट्र देखील अपेक्षेपेक्षा यावर्षी जास्त पाऊस पडलेला आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे जिल्ह्यात चांगलाच पाऊस पडलेला आहे.
सध्या परतीचा पाऊस चालू आहे. आज राज्यातील अनेक ठिकाणी हा परतीचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक पिकांना या पावसामुळे फायदा झालेला आहे. परंतु खरीप हंगामातील काही ठिकाणी पिकांचे मात्र यामुळे नुकसान झालेले दिसत आहे. हवामान विभाग पावसाबद्दल अंदाज देतच असतात. त्यांलो दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार, धुळे, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे खास करून मुंबईमध्ये शनिवार, रविवारी मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) बरसणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईला पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यांसारख्या जिल्ह्यांना देखील चांगलाच मारा बसणार आहे. तसेच नाशिक घाट परिसर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर यांसारख्या ठिकाणी देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.