Weather Update | संपूर्ण राज्यात परतीचा पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणेसह राज्यातील विविध ठिकाणी या पावसाने सुरुवात केलेली आहे. अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळे आजही राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामानाने विभागाकडून वर्तमान झालेली आहे. हवामान विभाग हे दररोज पावसाबद्दलच्या अंदाज व्यक्त करत असतात. अशातच त्यांनी आज म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी कशाप्रकारे हवामाना असणार आहे? हे सांगितलेले आहे. त्यामुळे आज देखील राज्यातील अनेक ठिकाणी आपल्याला पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
आज मुंबई, ठाणे तसेच पालघर यांच्यासह कोकण किनारपट्टीवर देखील पावसाचे हजेरी लागणार आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होणार आहे. हवामान विभागाने मुंबई ठाण्याला आज येलो अलर्ट दिलेला आहे. यासोबत या ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अरबी समुद्र चक्री वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरणात मोठे बदल झालेले आहेत. आणि त्यामुळेच वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे.
कोकणात देखील पावसाला सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये संध्याकाळी रोज मेघगर्जेसह पावसाला सुरुवात झालेली आहे बत्यामुळे आज देखील मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यत आहे. तसेच आठवडाभर हे हवामान कायम असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात देखील आठवडाभर पावसाची शक्यता आहे.
या परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. सोयाबीन आणि कापूस या पिकाला पावसाचा चांगला फटका बसलेला आहे. आणि या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यासोबतच भारताचे पीक आता काढणे झालेले आहेत. परंतु सततच्या पडणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांना भाताचे पीक काढता येत नाही.