Weather Update | सोसाट्याच्या वाऱ्यासह राज्यातील या जिल्ह्यात कोसळणार पाऊस; हवामान विभागाने दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | यावर्षी संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. तसेच काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. नद्यांना पूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यंदा दरवर्षीपेक्षा धरणांमध्ये देखील पाणीसाठा भरपूर साठलेला आहे. अजूनही अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. हवामान विभाग दररोज पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त करत असतात. अशातच आज म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी देखील हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडण्याचा इशारा दिलेला आहे. आता हा पाऊस नक्की कोणत्या शहरात आणि जिल्ह्यात पडणार आहे ? हे आज आपण जाणून घेऊया.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तास मुंबई तसेच उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच या ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये आज कमाल तापमान 32°c तर किमान तापमान 26 सेल्सिअस राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील आज मुसळधार पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा देखील पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रति तास एवढा असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना देखील आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा वेग वाढणार आहे. त्यातही विदर्भ आणि मराठवाड्यांमध्ये पुढील 48 तासात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी परभणी, हिंगोली, जळगाव, नांदेड, जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 21 सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यात पावसाचा देण्यात आलेला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात झालेली आहे.